Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jul 03, 2013 - 06:01:48 AM


Title - रेल्वेगाड्यांच्या वेळेत, क्रमांकात बदल
Posted by : puneetmafia on Jul 03, 2013 - 06:01:48 AM

सोलापूर - प्रवाशांची वाढती मागणी व गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोलापूर विभागात धावणार्‍या काही रेल्वेगाड्यांच्या वेळेत आणि क्रमांकात बदल करण्यात आले असून या बदलाची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येत आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या गाड्यांच्या वेळेत बदल कुर्डवाडी - मिरज पॅसेंजर (गाडी क्रमांक 51437/ 38) या गाडीच्या वेळेत बदल होत आहे. सुधारित वेळानुसार ही पॅसेंजर कुर्डुवाडी स्थानकावरून सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी निघेल आणि मिरजला दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी पोहचेल. तसेच परतीचा प्रवास करताना ही गाडी मिरज येथून सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी निघेल आणि कुडरुवाडीला रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पोहचेल.

पंढरपूर - साईनगर शिर्डी एक्सप्रेस या आठवड्यातून तीन दिवस धावणार्‍या गाडीच्या वेळेतही बदल झाला आहे. सुधारित वेळेनुसार ही गाडी पंढरपूर स्थानकावरून दुपारी 3 वाजता निघेल आणि शिर्डीला 8 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. तसेच या गाडीची शिर्डीवरून निघणारी पूर्वीची वेळ होती तीच कायम ठेवण्यात आली आहे. परतीच्या वेळेत कोणताही बदल नाही.

हैदराबाद - गुलबर्गा पॅसेंजर या गाडीच्या वेळेत बदल झाला असून नव्या वेळेनुसार हैदराबाद स्थानकावरून ही गाडी दुपारी साडेचार वाजता निघेल. गुलबग्र्याला रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी पोहचेल.गुलबग्र्याहून निघणार्‍या निर्धारित वेळेत बदल करण्यात आलेला नाही.

विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाडीच्या क्रमांकात 10 सप्टेंबरपासून बदल होत आहे. पूर्वी या गाडीचा क्रमांक 22819/22820 असा होता. तो आता बदलून 18519/ 18520 असा करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.