Indian Railways News => Topic started by greatindian on Jul 21, 2013 - 00:00:53 AM


Title - रेल्वे स्टेशनच्या स्थलांतरास इतिहासप्रेमींचा विरोध
Posted by : greatindian on Jul 21, 2013 - 00:00:53 AM

कोल्हापूर

रेल्वे स्टेशन सध्याच्या जागेवरून हलवून ते मार्केट यार्ड येथील गुड्स यार्डमध्ये स्थलांतरित करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला . मात्र , त्याला इतिहासप्रेमी कार्यकर्ते अमित आडसुळे , संजय चव्हाण , व्ही . के . खोडके , अशोक बाबूराव रानगे , शंकर बुने , आदींनी विरोध केला असून , याबाबत महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे .

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरच्या आर्थिक विकासासाठी कोल्हापूर ते मिरज रेल्वेची सुरुवात केली . ' आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याची संपत्तीची साधने वाढण्याकामी त्याचा फायदेशीर परिणाम होईल , अशी माझी उमेद आहे . माझ्या अल्पवयात कोल्हापूरचे कल्याण करण्याकरिता हरेक कृत्य केले जाईल व हा आगगाडीचा रस्ता हे एक त्यापैकी ठळक उदाहरण असे मी जाणतो ,' असे उद्गार शाहू महाराजांनी काढले होते . यातून रेल्वे स्टेशनमागची शाहू महाराजांची उत्कट तळमळ दिसून येते . रेल्वे स्टेशन शाहू महाराजांच्या कल्पक धोरणात्मक विचारसरणीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आजही कोल्हापूरची शान वाढवत आहे .
शाहू महाराजांच्या देदीप्यमान कारकिर्दीचा साक्षीदार असणारे हे रेल्वे स्टेशन सध्याच्या ठिकाणावरून हलविणे म्हणजे शाहू महाराजांचे आणखी एक कार्यच विस्मृतीत घालवण्याचे प्रयत्नच म्हणावा लागेल .