Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 22, 2013 - 12:01:07 PM


Title - रेल्वे प्रवाशांना आता दारातच तिकिटे
Posted by : nikhilndls on Jul 22, 2013 - 12:01:07 PM

सोलापूर

प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोलापूर रेल्वे विभागाने आता प्रवाशांना ' कॅश ' करण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ' मुश्किल आसान ' योजनेच्या माध्यमातून फिरत्या आरक्षण केंद्राद्वारे प्रवाशांना त्यांच्या घराजवळ तिकीट आरक्षण करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हे केंद्र सुरू होणार आहे , अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ परिचलन व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली.

सोलापूर रेल्वे स्टेशनवर जाऊन कित्येक तास रांगेत थांबूनही प्रवाशांना रेल्वे तिकिटाच्या आरक्षणापासून वंचित राहावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन गायकवाड यांनी मध्य रेल्वेच्या माध्यमातून सुरू असलेली ' मुश्किल आसान ' ही योजना सोलापुरात राबविण्याचे ठरविले. सध्या ही योजना गुजरातमधील वापी आणि आनंद या दोन ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर भारतातील तिसरे फिरते तिकीट आरक्षण केंद्र सोलापुरात सुरू करण्याला रेल्वे बोर्डाने हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यानुसार लवकरच सोलापूरसह तुळजापूर या ठिकाणीसुद्धा फिरते आरक्षण केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेचा लाभ सोलापूरसह अक्कलकोट आणि तुळजापुरातील रेल्वेप्रवाशांना होणार आहे. प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

आरक्षण केंद्रांच्या वेळा व ठिकाण

सोमवार - सकाळी ८ ते ११ विजापूर रोडवरील भारती विद्यापीठासमोर , ११.३० ते दुपारी तीनपर्यंत आरटीओ कार्यालय.
मंगळवार आणि बुधवार - तुळजापूर तुळजाभवानी मंदिर व शिवाजी चौक.
गुरुवार आणि शुक्रवार - अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर व बसस्थानक.
शनिवार - सकाळी ८ ते ११ होटगी रोडवरील आसरा चौक , सकाळी ११.३० ते दुपारी तीनपर्यंत विमानतळासमोर.
रविवार - सकाळी ८ ते ११ अशोक चौकातील डब्लूआयटी , ११.३० ते ३ या वेळेत दयानंद कॉलेजसमोरील आरक्षण केंद्रामधून प्रवाशांना तिकिटे मिळतील.