Indian Railways News => Topic started by nikhilndls on Mar 07, 2013 - 08:00:20 AM


Title - रेल्वे गोंधळ - वडाळ्यात लोकल घसरली , सायनला पेंटोग्राफ तुटला
Posted by : nikhilndls on Mar 07, 2013 - 08:00:20 AM

वडाळ्यात लोकल घसरली

सायनला पेंटोग्राफ तुटला



गोंधळ नसेल तो रेल्वेप्रवास कसला , अशी भावना सध्या रेल्वेप्रवाशांमध्ये वाढीस लागली आहे . ती दृढ करण्यास मंगळवारी मध्य रेल्वेने हातभार लावला . चाकरमानी ऐन घरी जाण्याच्या वेळी वडाळा स्टेशनजवळ लोकलची चाके रुळवरून घसरली ; तर सायनला पेंटोग्राफ तुटला . यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला .

हार्बर मार्गावर वाशीहून सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या लोकलने सायंकाळी ४ . २३च्या सुमारास वडाळा स्टेशन सोडताच गाडीची चाके ट्रॅकवरून खाली उतरली . ही लोकल सुटण्यापूर्वी गाठोडे घेऊन जाणारा प्रवासी ट्रॅक ओलांडण्याच्या प्रयत्नात होता . मात्र , लोकल सुटल्याचे लक्षात येताच त्याने गाठोडे तिथेच टाकून ट्रॅक ओलांडला . या गाठोड्याला लोकल आपटल्याने तिची दोन चाके ट्रॅकवरून घसरली . त्यामुळे सीएसटीच्या दिशेने येणारी वाहतूक बंद झाली . रेल्वे अधिकारी - कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्यानंतर अर्ध्यातासानंतर सेवा पूर्ववत झाली . परंतु , या काळात हार्बर मार्गावरील तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या . तसेच या प्रकारामुळे सहा लोकल एका मागोमाग एक थांबल्या होत्या . अर्धा तासानंतर या लोकल रवाना झाल्या .

तसेच , मध्य रेल्वेवर सायन येथे डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा पेंटोग्राफ सायंकाळी ४ . ०२ मिनिटांनी तुटल्याने यामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली . दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली तरी , प्रवाशांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला .