| Indian Railways News => | Topic started by AllIsWell on Jul 21, 2013 - 03:59:42 AM |
Title - रविवारी तीनही मार्गावर मेगाब्लॉकPosted by : AllIsWell on Jul 21, 2013 - 03:59:42 AM |
|
|
मुंबई - रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक होणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण व ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. याकाळात अप धिम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर चालवल्या जातील. त्याच बरोबर कल्याण-अंबरनाथ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात कल्याण ते अंबरनाथ लोकल सेवा बंद राहील. तर हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला आणि वडाळा ते वांद्रे दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक होईल. सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असेल. |