Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jul 24, 2012 - 04:00:08 AM


Title - मोबाईलवर ऐकायला येतील गर्भातील अर्भकाचे ठोके
Posted by : riteshexpert on Jul 24, 2012 - 04:00:08 AM

एमआयटीचे प्रा.चौरसिया यांचा शोध
गोंदिया
गर्भवती महिलेच्या आरोग्य परीक्षणात आणखी एक नवीन संशोधन करण्यात आले आहे. गर्भाशयातील अर्भकांचे ठोके ऐकण्यासाठी स्टेथेस्कोपचा वापर केल्या जातो. परंतु आता नवीन तंत्रज्ञानामुळे अल्ट्रासाऊंड डॉपलरने ही ठोके ऐकायला येतात. मात्र गर्भाशयातील अर्भकांचे ठोके सरळ मोबाईलवर ऐकायला येणार असल्याचा शोध मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी व तांत्रिकी संस्थान गोंदियाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार विभागाचे प्रा.विजय चौरसिया यांनी लावला आहे.
आयआयटी जोधपूर येथील प्रा.ए.के. तिवारी यांच्या मार्गदर्शनात प्रा.चौरसिया यांनी शोधनिबंध तयार केला आहे. ‘ब्लुटूथ फेटल हार्टरेट मॉनीटरिंग सिस्टम’ असे नाव त्या शोधाला दिले आहे. या यंत्रणेत संगणक सॉफ्टवेअरला एकीकृत करून उपकरण तयार करण्यात आले. मेडीकल व संगणक विज्ञान तसेच अभियांत्रिकीच्या संमिश्र अभ्यासातून हा नवीन शोध पुढे आला आहे.
या उपकरणाला गर्भवती महिलेच्या हातावर ठेवण्यात येते. यामुळे गर्भाशयातील अर्भकांचे ठोके जवळ असलेल्या संगणकापर्यंत किंवा मोबाईलपर्यंत पोहोचतात. अर्भकाच्या हृदयाचे ठोके गर्भवती महिलेच्या पोटावर कंपन स्वरुपात ऐकायला येतात. त्या ठोक्यांना साफ्टवेअरच्या मदतीने एकत्र करून शिशु किती सुरक्षित आहे याची माहिती जाणून घेणे सहज होते.
या नवीन शोधतंत्रामुळे बालकालाच हे ठोके ऐकायला येणार नाही तर डाटा कॉम्प्युटर व मोबाईल येथेही हे ठोके ऐकायला येऊ शकतात. या माध्यमातून गर्भाशयातील अर्भकांची ऑनलाईन तपासणी केली जाऊ शकते. या शोधाला पूर्ण करण्यासाठी प्रा.चौरसिया यांनी गर्भवती महिलांचा गर्भावस्थेच्या विविध पैंलूंचे परीक्षण केले. अर्भकांच्या ठोक्यांना अल्ट्रासाऊंड आधारीत डॉपलर तंत्रज्ञानामुळे सर्व माहिती एकत्र करून हा शोध पूर्ण केला. या शोधात ९८ टक्के यश प्राप्त झाले. या उपकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे उपकरण एक हजार रुपयापेक्षा कमी किंमतीत तयार केले जाऊ शकते. या शोधनिबंधाला शोधपत्रिका ‘इंटरसाईस टेलर अँन्ड फ्रान्सीस, अल्सवेयर’ यामध्ये प्रकाशित केले आहे.