| Indian Railways News => | Topic started by railgenie on Jul 21, 2013 - 03:59:49 AM |
Title - मुंबईत वातानुकूलित लोकल अडचणीचीचPosted by : railgenie on Jul 21, 2013 - 03:59:49 AM |
|
|
मुंबई – पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित आणि हार्बर मार्गावर स्वयंचलीत दरवाजे असणारी लोकल सेवा चालवण्याचा विचार केला जात आहे. मात्र मुंबईतील स्थिती पाहता पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल चालवणे अडचणीचे ठरू शकते, असे मत रेल्वे बोर्डाचे सदस्य सुबोधकुमार जैन यांनी व्यक्त केले. अशा लोकल चालवण्यासाठी वेगळ्या कॉरिडोरची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील वातानुकूलित लोकलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुंबईत उपनगरीय लोकलला मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. अशा स्थितीत वातानुकूलित लोकल चालवताना या लोकलचे जोपर्यंत दरवाजे बंद होत नाहीत तोपर्यंत ती पुढे सरकरणार नाही. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या मागे असणा-या इतर लोकलवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवाय लोकलच्या फे-याही कमी होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे वातानुकूलित लोकलची प्रवासी क्षमताही साध्या लोकलच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ही लोकल मुंबईकर स्वीकारतील का, असा प्रश्नच जैन यांनी उपस्थित केला. |