Indian Railways News => | Topic started by RailXpert on May 25, 2012 - 04:00:10 AM |
Title - मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाला डॉ. आंबेडकरांचे नाव द्याPosted by : RailXpert on May 25, 2012 - 04:00:10 AM |
|
मुंबई- मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाला राजीव गांधी यांचे नाव देण्याच्या खासदार संजय निरुपम यांच्या मागणीविरोधात आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली. डॉ. आंबेडकर स्थानक असे लिहिलेले फलक या वेळी फडकविण्यात आले. कॉंग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी नुकतीच या स्थानकाला राजीव गांधींचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्या मागणीचा या वेळी निषेध करण्यात आला व निरुपम यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्थानकाला डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पूर्वीच केली होती, मात्र कॉंग्रेसचे खासदार या प्रश्नी राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांची दलितविरोधी भूमिका स्पष्ट होते असा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे. निरुपम यांनी आपली भूमिका बदलली नाही तर कार्यकर्ते त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. श्रीकांत भिसे, बबन मोरे, नितीन मोरे, वामन कानडे, बाबू जाधव या कार्यकर्त्यांनी या निदर्शनांमध्ये भाग घेतला. |