Indian Railways News => Topic started by eabhi200k on Jun 12, 2012 - 18:00:34 PM


Title - मुंबई-नागपूर दुरांतो 'सबसे तेज'-----मुंबई
Posted by : eabhi200k on Jun 12, 2012 - 18:00:34 PM

मध्य रेल्वेच्या ताफ्यातून ' नॉन स्टॉप ' धावणा - या दुरांतो गाड्या प्रवाशांसाठी जलद आणि आरामदायी पर्याय ठरत असताना या गाड्यांनाही मागे टाकणारी मुंबई-नागपूर दुरांतो येत्या शनिवारी दाखल होत आहे. नवे तंत्रज्ञान , नवी साधने यामुळे वेगाच्या बाबतीत अधिक गतीमान असलेली ही गाडी सुरक्षा आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीनेही सरस ठरणार आहे.
मुंबई ते नागपूरदरम्यान नॉनस्टॉप धावणाऱ्या या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये जर्मन तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रथमच अंतर्बाह्य स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. डब्यांप्रमाणेच एअर सस्पेन्शन्स आणि गाडीखालील अन्य पार्ट्ससाठीही स्टीलचाच वापर करण्यात आला आहे. स्टीलच्या वापरामुळे गाडीचे वजन कमी झाल्याने वेगातही वाढ झाली आहे. ही गाडी १२० किमी प्रति तासाने धावू शकत असल्याने वेळतही बचत होईल. इतर गाड्यांच्या २५ वर्षांच्या आयुष्यापेक्षा या दुरांतोचे आयुष्य किमान ३० वर्षांचे आहे. त्याशिवाय , प्रवासादरम्यान गाडीच्या वेगामुळे बसणारे झटकेही यात कमी होतील , असा दावाही रेल्वेकडून केला जात आहे.
प्रवाशांच्या बसण्याच्या व्यवस्थेच्याबाबतीतही हि गाडी आरामदायी आहे. येथील सीट्स तुलनेने अधिक मोठ्या आहेत. इतर गाड्यांतील ' थ्री एसी टायर ' डब्यांमध्ये ६४ प्रवासी बसू शकतात. मात्र , या नव्या दुरांतोमधील ' थ्री टायर एसी ' मध्ये ७२ प्रवाशांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. नॉन-एसीतील स्लीपर कोचमध्ये ७८ जागा उपलब्ध असून इतर गाड्यांमध्ये ही क्षमता ७२ प्रवाशांची आहे.
या एक्स्प्रेससाठी नेहमीच्या पद्धतीने रंगकाम न करता विन्येल पेंटिंग तंत्र वापरले गेले आहे. सुमारे १८ महिने टिकू शकणाऱ्या या रंगबिरंगी विन्येलमुळे त्यात वेगळेपणा भासत आहे. इंग्लंडमधून आलेल्या विनेलमुळे रंगकामावरील खर्च आणि वेळही वाचला आहे.