Indian Railways News => Topic started by greatindian on Aug 24, 2013 - 18:00:45 PM


Title - मुंडेंसह शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांना भेटले
Posted by : greatindian on Aug 24, 2013 - 18:00:45 PM

बीड : केंद्रीय रेल्वे अर्थ संकल्पात मंजूर असलेली मुंबई- लातूर-परळी-नांदेड रेल्वे सेवा त्वरित चालू करावी, या मागणीसाठी भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्या नेत्तृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शुक्रवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
मुंबई-लातूर एक्सप्रेस परळीमार्गे नांदेडपर्यंत सुरू करण्याबाबत यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. ही रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी परळी रेल्वे संघर्ष समितीने १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. संघर्ष समितीच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात आ. पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खा. मुंडे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.