Indian Railways News => | Topic started by railgenie on Oct 04, 2013 - 14:59:29 PM |
Title - मानकापूर रेल्वे क्रॉसिंग डेंजर झोनPosted by : railgenie on Oct 04, 2013 - 14:59:29 PM |
|
नागपूर: मानकापूर रेल्वे क्रॉसिंगवर कधीही जा ... डोकं खराब झाल्याशिवाय राहणार नाही . मजबुरी म्हणून या रोडवरून जावे लागते , अशीच नागरिकांची मानसिकता आहे . येथील आरओबीचे ( रेल्वे ओव्हर ब्रिज ) काम सुरू असल्यामुळे बांधण्यात आलेल्या नव्या रेल्वे क्रॉसिंगवर वारंवार ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण होते . त्यामुळे या ठिकाणी भीषण अपघाताची भीती आहे . वाहतूक पोलिस आणि रेल्वे प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे येथे वाहतुकीचा बोऱ्या वाजला असून , या मार्गाने जाणाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे . |