Indian Railways News => Topic started by irmafia on Jun 28, 2013 - 06:00:25 AM


Title - माथेरानची ‘मान्सून’ राणी…
Posted by : irmafia on Jun 28, 2013 - 06:00:25 AM

नेरळ

डोंगरकपारीतून मार्ग काढत नेरळहून माथेरानला जाणारी मिनी ट्रेन हे पर्यटकांचे विशेष आकर्षण. ही 'माथेरानची राणी' पावसाळ्यात अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालू ठेवण्यात आली आहे.

वारंवार नादुरुस्त होणारे कोळशाच्या वाफेवर चालणारे इंजिन त्यासाठी डिझेलचे करण्यात आले आहे. इंधनाचे माध्यम बदलले असले तरीही वाफेच्या इंजिनाचा डौल तोच आहे.