| Indian Railways News => | Topic started by riteshexpert on Jun 26, 2013 - 23:30:10 PM |
Title - महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा निम्मा भार रेल्वेवरPosted by : riteshexpert on Jun 26, 2013 - 23:30:10 PM |
|
|
लोकमधील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याबाबत न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही रेल्वे प्रशासन त्याबाबत अद्याप उदासीन असल्याची बाब राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला गृहरक्षक उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. मात्र त्यासाठीचा निम्मा खर्च उचलण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने फेटाळून लावल्याने ही योजना बारगळल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. त्यावर गृहरक्षक तैनात करण्याचा ५० टक्के खर्च रेल्वे प्रशासनाने उचलण्याचे आदेश अखेर न्यायालयाला द्यावे लागले. |