Indian Railways News => Topic started by TrustMe on Jul 03, 2013 - 21:04:45 PM


Title - मनमाड रेल्वे स्टेशनवरील पूल लवकरच
Posted by : TrustMe on Jul 03, 2013 - 21:04:45 PM

मनमाड

चार वर्षापासून मनमाड रेल्वे स्टेशनवरील अर्धवट असलेल्या नवीन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम लवकरच पूर्ण होईल . परंतु या कामासाठी रेल्वेला एक मेगाब्लॉक हवा आहे . त्याला मुख्यालयातून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे .

निधीअभावी या पुलाचे काम रखडले होते . मात्र आता निधी उपलब्ध झाल्यामुळे पुलाच्या उर्वरित कामाला सुरुवात झाली आहे . पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४वरून स्टेशनच्या आत - बाहेर जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एका पुलाची सोय होणार आहे .

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मनमाडचे रेल्वे स्टेशन महत्त्वपूर्ण जंक्शन मानले जाते . या रेल्वे स्टेशनवर नेहमीच वर्दळ असते . रेल्वे स्टेशनमध्ये येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी एकमेव पूल आहे . ‌ तो अपुरा पडत असल्याने या रेल्वे स्टेशनवर आणखी एक पूल बांधण्यात यावा , अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती . प्रवाशांच्या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने चार वर्षांपूर्वी पार्सल ऑफिसजवळ प्लॅटफॉर्म ६ , २ , ३ व ४ यांना जोडणाऱ्या पुलाचे काम हाती घेतले आहे . अवघ्या काही दिवसांतच या पुलाचे काम पूर्ण होईल , असे रेल्वे सूत्रांनी सांगितले .