Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jun 15, 2012 - 20:00:06 PM


Title - मनमाड-पुणे एक्सप्रेस १ जुलैपासून भुसावळपासून--Manmad-Pune Express to run as Bhusaval-Pune Express fr
Posted by : puneetmafia on Jun 15, 2012 - 20:00:06 PM

रेल्वे प्रशासनाने मनमाड-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाडीच्या विस्तारीकरणाचा अखेर निर्णय घेतला आहे. ही गाडी आता १ जुलैपासून मनमाड-पुणेऐवजी भुसावळ-पुणे अशी धावणार आहे. मात्र नाशिक स्टेशनवर गाडी येणाच्या आणि जाण्याच्या वेळेमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही.

एक जुलैपासून ही गाडी भुसावळहून रात्री साडेबारा वाजता निघून पहाटे ४.२५ ला मनमाड , ५.३० ला नाशिक , ५.४१ ला देवळाली , ६.१५ ला इगतपुरी , ८.०० ला कल्याण , ९.०० ला पनवेल अशाप्रकारे प्रवास करुन दुपारी १२.०५ ला पुण्याला पोहोचेल. दुपारी १२.४५ ला पुण्याहून परतीच्या प्रवासाला निघून दुपारी १५.१५ ला कल्याण , १७.२५ ला इगतपुरी , १८.१३ ला देवळाली , १८.२० ला नाशिक , १९.३५ ला मनमाड अशाप्रकारे रात्री २२.१० ला भुसावळला पोहोचेल.

नाशिककरांच्या मागणीमुळे सुरुवातीला नाशिक-पुणे दरम्यान ही गाडी सुरू झाली होती. गाडी सुरू करण्यापूर्वी ती कल्याण की पनवेल कोठून वळवायची यावर अनेक महिने चर्चा सुरू होती. अखेर पनवेल येथून गाडी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वळणामुळे गाडीला पुण्याला पोहचण्यास उशीर होत असतानाही प्रवाशांनी या गाडीला चांगला प्रतिसाद दिला.

कालांतराने या गाडीला मुक्कामाला ठेवण्यासाठी नाशिकरोड स्थानकावर जागा नसल्याचे कारण देऊन ती मुक्कामासाठी मनमाड स्थानकावर पाठवण्यात येऊ लागली. रिकामी गाडी पाठवल्याने खर्च वाढत असल्याने या गाडीचे नाशिक-पुणे ऐवजी मनमाड-पुणे असे नामकरण व विस्तारीकरण करण्यात आले. आता पुन्हा विस्तारीकरण करून ती भुसावळ-पुणे करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून , त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार आहे.