Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jul 03, 2013 - 03:00:19 AM


Title - मध्‍य रेल्‍वेच्‍या वेळापत्रकात 1 जुलैपासून होणारा बदल जाणून घ्या
Posted by : riteshexpert on Jul 03, 2013 - 03:00:19 AM

मुंबई- रेल्‍वेच्‍या वेळापत्रकामध्‍ये दरवर्षी 1 जुलैपासून बदल होत असतो. त्‍यानुसार मध्‍य रेल्‍वेच्‍या अनेक प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलण्‍यात आले आहे. बदललेल्‍या प्रमुख गाड्यांचे नवे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहणार आहे. सविस्‍तर वेळापत्रक जाणून घेण्‍यासाठी येथे क्लिक करा. देशभरातील इतर विभागांच्‍या नव्‍या रेल्‍वे वेळापत्रकाबाबत माहिती घेण्‍यासाठ येथे क्लिक करा.

- 12289 मुंबई-नागपूर दुरांतो एक्‍स्‍प्रेस आता नागपूरला सकाळी 7.15 ऐवजी 7.20 वाजता पोहोचेल.

- 12290 नागपूर-मुंबई दुरांतो एक्‍स्‍प्रेस आता नागपूर येथून रात्री 8.50 ऐवजी रात्री 8.40 वाजता सुटेल आणि मुंबईला 7.50 वाजता पोहोचेल.

- 12222 हावडा-पुणे दुरांतो एक्‍स्‍प्रेस आता पुण्‍याला सकाळी 11.35 ऐवजी सकाळी 11.45 वाजता पोहोचेल.

- 12264 निझामुद्दीन-पुणे दुरांतो एक्‍स्‍प्रेस पुण्‍याला सकाळी 7.00 ऐवजी सकाळी 7.10 वाजता पाहोचेल.

- 12297 अहमदाबाद-पुणे दुरांतो एक्‍स्‍प्रेस पुण्‍याला सकाळी 7.00 ऐवजी सकाळी 7.10 वाजता पाहोचेल.

- 12298 पुणे-अहमदाबाद दुरांतो एक्‍स्‍प्रेस पुण्‍याहून रात्री 9.45 ऐवजी रात्री 9.35 सुटेल.

- 16535 यशवंतपूर-सोलापूर गोलघुमट एक्‍स्‍प्रेस यशवंपूर येथून रात्री 7.45 ऐवजी 7.35 वाजता सुटेल

- 16536 सोलापूर-यशवंतपूर गोलघुमट एक्‍स्‍प्रेस सोलापूर येथून दुपारी 3.35 ऐवजी दुपारी 2.40 वाजता सुटेल. यशवंतपूरला ही गाडी सकाळी 9.15 ऐवजी सकाळी 7.35 वाजता पोहोचेल.

- 11051 सोलापूर-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्‍हापूर एक्‍स्‍प्रेस सोलापूर येथून सकाळी 8.10 ऐवजी रात्री 23.35 वाजता सुटेल. ही गाडी कोल्‍हापूरला दुपारी 2.15 ऐवजी सकाळी 6.20 वाजता पोहोचेल.

- 11052 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्‍हापूर-सोलापूर एक्‍स्प्रेस कोल्‍हापूर येथून सकाळी 8.45 ऐवजी रात्री 23.55 वाजता सुटेल. सोलापूरला ही गाडी दुपारी 3.00 ऐवजी सकाळी 7.45 वाजता पोहोचेल.

- 11403 नागपूर-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्‍हापूर एक्‍स्‍प्रेस कोल्‍हापूरला दुपारी 3.25 ऐवजी दुपारी 2.15 वाजता पोहोचेल.

- 11002 पंढरपूर-साईनगर शिर्डी एक्‍स्प्रेस पंढरपूर येथून दुपारी 1.20 ऐवजी दुपारी 1 वाजता पोहोचेल.

-12914 नागपूर-इंदूर एक्‍स्‍प्रेस नागपूर येथून सायंकाळी 7.15 ऐवजी सायंकाळी 7 वाजता सुटेल.

- 12924 नागपूर-इंदूर एक्‍स्‍प्रेस (देवास मार्गे) नागपूर येथून सायंकाळी 7.15 ऐवजी सायंकाळी 7 वाजता सुटेल.

- 11409 पुणे-कोल्‍हापूर एक्‍स्‍प्रेस पुण्‍याहून सकाळी 9.15 ऐवजी सकाळी 9 वाजता सुटेल.

बदललेल्‍या वेळापत्रकासंदर्भात प्रवाशांनी आपापल्‍या रेल्‍वे स्‍थानकावर संपर्क करुन सविस्‍तर माहिती घ्‍यावी, असे आवाहन रेल्‍वेने केले आहे.

याशिवाय काही गाड्यांचे क्रमांक बदलण्‍यात आले आहेत. तसेच काही गाड्यांचा विस्‍तार करण्‍यात आला आहे. विस्‍तारीत गाड्या आणि नव्‍या गाड्यांसंदर्भात माहिती रेल्‍वेतर्फे कळविण्‍यात येईल.