Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jul 03, 2013 - 18:04:08 PM


Title - मध्यरेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Posted by : riteshexpert on Jul 03, 2013 - 18:04:08 PM

नाशिकरोड

मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे . यातील काही गाड्या या नेहमीच्या वेळेत धावणार आहेत तर काही गाड्या ५ ते १० मिनिटाच्या उशीराने धावणार आहे . या बदलाबरोबरच दोन नवीन गाड्यांचा समावेश आहे . या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आहे .
रेल्वे मंत्रालयाने ३० जूनला नवीन वेळापत्रक जाहीर केले . पुणे - भुसावळ गाडीच्या वेळेत १५ मिनिटांचा बदल केल्याने गोदावरी एक्स्प्रेसपूर्वी पुणे गाडी येईल ; मात्र पंचवटीच्या वेळेत कुठलाही बदल झालेला नाही .

या गाड्यांच्या वेळांत बदल

मुंबईकडे धावणाऱ्या ( अप ) गाड्यांमध्ये अमरावती - सीएसटी , कानपूर सुपरफास्ट , छप्रा - सीएसटी , रॅक्सोल - एलटीटी , पंजाब मेल , बनारस - एलटीटी , हावडा - एलटीटी , मंगला एक्स्प्रेस , पुणे - भुसावळ , राजेंद्रनगर , राज्यराणी एक्स्प्रेस , महानगरी , गोदान , पुष्पक , भागलपूर , गोहात्ती , बरेली , गीतांजली , साकेत , तुलसी , फैजाबाद , तपोवन , लखनौ सुपरफास्ट , लष्कर , कामायनी , पवन व सुलतानपूर एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे . तर , भुसावळकडे धावणाऱ्या ( डाउन ) दादर - साईनगर , एलटीटी - विशाखापट्टणम , महानगरी , दादर - वाराणसी , मनमाड - गोदावरी , पुणे - भुसावळ एक्स्प्रेसच्या पूर्वीच्या वेळेत ५ ते २५ मिनिटांचा बदल केला आहे .
नवीन वेळापत्रकानुसार गाड्या धावण्यास सुरवात झाली आहे . वरिष्ठांकडून वेळापत्रक आल्यास ते रेल्वे स्थानकावर लावले जाईल .

एम . बी . सक्सेना , स्टेशन मास्तर , ना . रोड रेल्वेस्थानक