Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 29, 2013 - 08:00:16 AM


Title - मध्य-हार्बरवर आज मेगाब्लॉक
Posted by : railgenie on Jul 29, 2013 - 08:00:16 AM

मध्य आणि हार्बर मार्गावर आज , रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेण्यात आला.

मध्य रेल्वेवर मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप फास्ट मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक चालेल. या काळात ठाण्यावरून मुंबईकडे सकाळी ११.२१ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत निघणाऱ्या अप फास्ट गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप स्लो मार्गावर चालवल्या जातील. या लोकल मुलुंड आणि सायन स्टेशन दरम्यान थांबतील. माटुंगानंतर या लोकल पुन्हा अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. सीएसटीवरून निघणाऱ्या सर्व डाऊन फास्ट लोकल सकाळी ११.१५ ते दुपारी २.५१ पर्यंत घाटकोपर , विक्रोळी , भांडुप , मुलुंड स्टेशनवर थांबतील.

हार्बर मार्गावर कुर्ला आणि मानखुर्द स्टेशन दरम्यान अप आणि डाऊनवर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक चालेल. सीएसटी ते पनवेल/बेलापूर/वाशी मार्गावरील लोकल सेवा सकाळी १०.२३ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसटी-मानखुर्द-पनवेल-ठाणे मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.

या काळात सीएसटी-कुर्ला आणि मानखुर्द-पनवेल मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येतील. त्याशिवाय सीएसटी आणि पनवेलपर्यंत आठ विशेष लोकल सोडण्यात येतील. या लोकल मस्जिद , सँडहर्स्ट रोड , भायखळा , दादर , कुर्ला , ठाणे आणि त्यापुढे सर्वच स्टेशनवर थांबतील.

सीएसटी-पनवेल विशेष गाड्या

सीएसटी - ठाणे - पनवेल स. १०.३१ वा. दु. ११.२१ वा. दु. १२.१४ वा. दु. ११.४० वा. दु. १२.३० वा. दु. १.२३ वा. दु. १२.५३ वा. दु. १.४३ वा. दु. २.३६ वा. दु. १.४९ वा. दु. २.३९ वा. दु. ३.३२ वा.

पनवेल-सीएसटी विशेष गाड्या स. १०.३५ वा. दु. ११.२८ वा. दु. १२.१८ वा. दु. ११.२४ वा. दु. १२.१७ वा. दु. १.०९ वा. दु. १२.४५ वा. दु. १.३८ वा. दु. २.२८ वा. दु. १.४२ वा. दु. २.३५ वा. दु. ३.२५ वा.