| Indian Railways News => | Topic started by puneetmafia on Jul 03, 2013 - 03:09:02 AM |
Title - मध्य रेल्वेला झाडाचे निमित्त विद्याविहार-घाटकोपरदरम्यान झाड कोसळून वाहतूक विस्कळीतPosted by : puneetmafia on Jul 03, 2013 - 03:09:02 AM |
|
|
कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेला रविवारी एका झाडाने हैराण केले. कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर विद्याविहार ते घाटकोपर या स्थानकांच्या दरम्यान एक झाड कोसळले आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या घटनेमुळे ओव्हरहेड वायरही तुटल्याने रेल्वेच्या वाहतुकीला चांगलाच फटका बसला. या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर वळवण्यात आली. हा गोंधळ तासभर चालला आणि प्रवाशांवर 'आधीच मेगा ब्लॉक त्यात..' असे म्हणण्याची वेळ आली. |