Indian Railways News => Topic started by greatindian on Aug 02, 2013 - 06:00:12 AM


Title - मध्य रेल्वेच्या 'गणपती स्पेशल'
Posted by : greatindian on Aug 02, 2013 - 06:00:12 AM

मुंबई

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने खूषखबर दिली आहे. कोकणात जाणाऱ्या नेहमीच्या एक्स्प्रेस गणपतीच्या दिवसांत दोन मिनिटांच फुल्ल झाल्याने चाकरमान्यांचे लक्ष विशेष गाड्यांकडे लागले होते.

प्रवाशांची मागणी पाहून मध्य रेल्वेने कोकणासाठी यंदा तब्बल १२० विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ४ सप्टेंबरपासून या विशेष गाड्या सोडण्यात येणार असून यात विशेष एसी एक्स्प्रेसचाही समावेश आहे. या गाड्यांचे आरक्षण ३१ जुलैपासून उपलब्ध होणार आहे. १२० गाड्यांमध्ये ६६ आरक्षित आणि ५४ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी गणपतीत कोकणासाठी मध्य रेल्वेने ८८ गाड्यांची सुविधा दिली होती. यंदा या गाड्यांची संख्या १२०पर्यंत नेत अतिरिक्त ३६ टक्के प्रवासी क्षमता वाढवली आहे. त्यापैकी , ६२ गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस , ४२ सीएसटी आणि १६ गाड्या दादरवरून सोडण्यात येणार आहेत.

एसी एक्स्प्रेसची सुविधा

मध्य रेल्वेने प्रथमच गणेशोत्सवासाठी एलटीटी-मडगाव एसी एक्स्प्रेस सेवेत आणली आहे. संपूर्णतः एसी असणारी एक्स्प्रेस एकूण तीन वेळा धावणार आहे.

अनारक्षित गाड्यांचा पर्याय

तिकिटे आरक्षित न झालेल्यांसाठी दोन अनारक्षित गाड्या सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले. त्यामध्ये दादर-सावंतवाडी , दादर-रत्नागिरी गाड्यांचा समावेश आहे.

सीएसटी-मडगाव (३२ फेऱ्या)

सीएसटी रात्री १२.२० वा. , मडगाव दुसऱ्या दिवशी दुपारी २.१० वा.

मडगाव दु. २.४० वा. , सीएसटी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वा. गुरुवारी नाही

एसी एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव

एलटीटी रात्री १२.५५ वा. मडगाव दु. २.१० वा.

मडगाव दु. २.४० वा. एलटीटी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वा. ५ , १२ , १९ सप्टेंबर रोजी धावेल.

एलटीटी-पेरनेम (गोवा) आरक्षित एक्स्प्रेस एलटीटी दु १ वा. , पेरनेम रात्री १.३० वा.

पेरनेम स. १०.४० वा. , एलटीटी रात्री १०.१५ वा. रविवार , बुधवार फेऱ्या

सीएसटी-पेरनेम विशेष एक्स्प्रेस

सीएसटी दु. १२.२५ वा. पेरनेम रात्री १.३० वा.

पेरनेम स. १०.४० वा. , सीएसटी रात्री १०.२० वा.

मुंबईतून ही गाडी , ७ , १० , १४ , १७ आणि २१ सप्टेंबरला सुटेल.

पेरनेमहून ८ , ११ , १५ , १८ आणि २२ सप्टेंबरला सुटेल.

एलटीटी-पेरनेम आरक्षित एक्स्प्रेस

एलटीटी दु. १ वा. पेरनेम रात्री १.३० वा.

पेरनेम स. १०.४० वा. एलटीटीला रात्री १०.१५ वा.

कोकणसाठी शुक्रवार , ६ , १३ आणि २० सप्टेंबर रोजी सुटणार

कोकणातून परतीच्या गाडी ७ , १४ आणि २१ सप्टेंबरला सुटतील.

दैनंदिन विशेष एलटीटी-रत्नागिरी (अनारक्षित)

एलटीटी रात्री १ वा. रत्नागिरी सकाळी ९.०५ वा.

रत्नागिरी दु. ११.३० वा. रात्री ७.२० वा.

दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस (अनारक्षित)

दादर सकाळी ७.५० वा. , सावंतवाडी रात्री ८.३० वा.

सावंतवाडी स. ४.५० वा. , दादर सायं. ४.१० वा.

कोकणसाठी रविवार , मंगळवार , शुक्रवार

कोकणहून सोमवार , बुधवार , शनिवार