Indian Railways News => Topic started by Mafia on May 20, 2012 - 23:30:20 PM


Title - मध्य रेल्वेची वाहतूक होणार विस्कळीत
Posted by : Mafia on May 20, 2012 - 23:30:20 PM

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगाब्लॉक असल्याने मनमाडहून कुर्ल्याला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस व नाशिक-मुंबई हॉलिडे एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. उत्तर भारतात जाणा-या गाड्या एक ते दोन तास उशिराने धावणार असल्याची माहि‌ती रेल्वे प्रशासनाने दिली.
मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस व नव्यानेच सुरू झालेली हॉल‌िडे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दादर-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस दोन तास उशिराने धावणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणारी हावडा एक्स्प्रेस ५० मिनिटे  उश‌िराने धावणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मुझफ्फरपूर पवन एक्स्प्रेस १ तास ४५ मिनिटे उश‌िराने धावणार आहे.