Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 23, 2013 - 20:00:07 PM


Title - मध्य रेल्वेचा तीन तिघाडा
Posted by : nikhilndls on Jul 23, 2013 - 20:00:07 PM

ठाणे

झोडपून काढणारा पाऊस आणि ठरलेला मेगाब्लॉक यामुळे आधीच रखडलेल्या मध्य रेल्वेच्या लोकलसेवेचा बदलापूरजवळ लोकल रूळावरून घसरल्याने रविवारी दिवसभर बोजवारा उडाला होता .

बदलापूर रेल्वे स्टेशनजवळील क्रॉसओव्हरवरच हा प्रकार घडल्याने बदलापूर ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन अशी दोन्हीकडील सेवा तब्बल चार तास बंद पडली होती . या बिघाडामुळे पुणे - जयपूर एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेसही रखडल्या होत्या .

मध्य रेल्वेने कल्याण ते अंबरनाथदरम्यान रविवारी दुपारी २ ते साडेतीन या वेळेत आणि कल्याण ते ठाणेदरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मेगाब्लॉक जाहीर केला होता . मेगाब्लॉकच्या वेळेत प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी बदलापूर ते कर्जतदरम्यान विशेष शटल सेवा सुरू केली होती .

या शटलपैकी एका लोकलच्या पहिल्या डब्याची तीन चाके दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी रुळावरून घसरली . या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले . हा प्रकार नेमका क्रॉसओव्हरवर घडल्याने अप व डाऊन अशा दोन्हीवरील वाहतूक बंद पडली . काही वेळात डाऊन मार्ग सुरू झाला मात्र , अप मार्ग तब्बल ४ तास , म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत बंद होता . त्यामुळे प्रवाशांना कल्याणपर्यंत जाणेदेखीस शक्य झाले नाही .