Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jun 09, 2012 - 15:00:21 PM


Title - मध्य रेल्वे: ग्रुप डी पेपरफुटी प्रकरण, आता एडीआरएम बारापात्रेंचा नंबर - railway recruitment sale gro
Posted by : nikhilndls on Jun 09, 2012 - 15:00:21 PM

भुसावळ: रेल्वे रिक्रुटमेंट सेल (आरआरसी)च्या वर्ग चारसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रo्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका भुसावळात फुटली होती. खळबळ उडवून देणार्‍या या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार शुक्रवारी रेल्वेच्या डीआरएम कार्यालयातील वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी व्ही.एस.देवघरे यांचा जबाब तपासाधिकारी संतोष साबळे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात बोलावून नोंदवला. या पुढील टप्प्यात एडीआरएम प्रदीप बारापात्रे यांनाही जबाबासाठी बोलावणे होणार असल्याने रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

3 जून रोजी आरआरसीची प्रo्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका योगेश भरसाकळे याच्याकडे सापडली होती. रेल्वेत नोकरीस असलेले इंदर भगीरथ भरसाकळे यांचा तो मुलगा आहे. ज्या वर्गात योगेशचा क्रमांक त्याच वर्गाचे पर्यवेक्षक म्हणून ते काम पाहत होते. तद्नंतर परीक्षा सुरू असताना योगेश केंद्रात नव्हता. तरीही पेपर जमा करण्याच्यावेळी तो आवारात अचानक प्रकटला. कटाचा सुगावा लागल्याने दबा धरून असलेले बाजारपेठचे उपनिरीक्षक संतोष साबळे यांनी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेसह योगेशला रंगेहाथ पकडले होते. यानंतर प्रकरण रफादफा करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वेगवेगळे फंडे वापरले. भरसाखळे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, उपनिरीक्षक साबळे यांनी घेतलेल्या पारदर्शक भूमिकेमुळे अनेक बेरोजगारांवर येणारे गंडातर टळू शकते. पेपरफुटीमागे अनेक उच्चपदस्थांची साखळी कार्यरत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी सावध तपासाला सुरुवात केली आहे. परीक्षा आणि रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलविणे हा या तपासामागील एक भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी उपनिरीक्षक साबळे यांनी वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी व्ही. एस. देवघरे यांचा जबाब नोंदवला. प्रश्नपत्रिका कोणाच्या ताब्यात होत्या, त्या पर्यवेक्षकाला केव्हा देण्यात आल्या, किती विद्यार्थी होते, हजेरी बुकात किती परीक्षार्थीची नोंद करण्यात आली? यानुषंगाने माहिती घेण्यात आली. मात्र, एवढय़ावरच पोलिसांचे समाधान झालेले नसून आता थेट मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे उपप्रबंधक बारापात्रे यांनाही चौकशीचा फेरा भोवणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, भरसाकळे यांना डिस्चार्ज मिळताच अटकेची शक्यता आहे.