Indian Railways News => Topic started by riteshexpert on Oct 05, 2013 - 12:00:26 PM


Title - मध्य रेल्वे कोलमडली
Posted by : riteshexpert on Oct 05, 2013 - 12:00:26 PM

ठाणे: तांत्रिक बिघाडामुळे ठाण्याजवळ मालगाडी गाडी बंद पडली. मालगाडी बंद पडल्यामुळे नागपूर-मुंबई दुरांतो अडकली. सकाळीच झालेल्या या गोंधळामुळे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्टेशनच्या दिशेने जाणा-या गाड्यांची सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वे कोलमडल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

दोन मोठ्या गाड्या अडकून पडल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडली आहे. सर्व जलद गाड्या (फास्ट लोकल) दिवा ते ठाणे दरम्यान धीम्या गतीच्या मार्गावर (स्लो ट्रॅकवर) वळवण्यात आल्या आहेत. बंद पडलेली मालगाडी दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.