Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jun 17, 2013 - 06:01:39 AM


Title - म . टा . प्रतिनिधी , नागपूर गोंदिया - मुंबई या मार्गावर धावणा - या विदर्भ एक्सप्रेसला ' वसंतराव नाईक
Posted by : puneetmafia on Jun 17, 2013 - 06:01:39 AM

म . टा . प्रतिनिधी , नागपूर

गोंदिया - मुंबई या मार्गावर धावणा - या विदर्भ एक्सप्रेसला ' वसंतराव नाईक विदर्भ एक्सप्रेस ' असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे . नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे .

विदर्भ एक्सप्रेसचे नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे . यासाठी रेल्वे बोर्डाकडूनही पाठपुरावा केला जाणार आहे . दरम्यान गुरुवारी यवतमाळ येथे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी वसंतराव नाईक जन्मशताब्दी महोत्सवाचे कार्यक्रम जाहीर केले . त्यातही त्यांनी विदर्भ एक्सप्रेसच्या नामांतराचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचा पुनरूच्चार केला . रेल्वेच्या नामांतरासोबतच वसंतराव नाईक यांच्यावर टपाल तिकिट काढण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे .