Indian Railways News => Topic started by irmafia on Jun 03, 2012 - 06:00:07 AM


Title - प्लॅस्टिकमुक्तीला साथ शेंगदाणे, पॉपकॉर्नची--मध्य रेल्वेवरील प्लास्टिकबंदी मोहिम
Posted by : irmafia on Jun 03, 2012 - 06:00:07 AM

मुंबई
मध्य रेल्वेवरील प्लास्टिकबंदी मोहिमेमुळे प्लॅस्टिक रॅपरमधील खाद्यपदार्थांची विक्री संपूर्णतः थांबली असून त्याला पर्याय म्हणून सीएसटी येथील रेल्वेच्या ' जनआहार केंद्रावर ' खारे शेंगदाणे , मसालेदार चणे , वडे , समोसे , पॉपकॉर्न उपलब्ध होणार आहेत.
प्लास्टिकबंदीमुळे वेफर्स , केक , बिस्कीट असे पदार्थ मिळणे बंद झाले तरी सीएसटी येथील रेल्वेच्या ' जनआहार केंद्रा ' वर ही विक्री सुरू होती. त्यावर आक्षेप घेतल्यावर रेल्वेने तात्काळ ही विक्री बंद केली. त्यावेळी , या पदार्थांना पर्यायी पदार्थ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार , ' जनआहार ' सह इतर स्टॉल्सवरही कागदी रॅपरमधून खारे शेंगदाणे , चणे , पॉपकॉर्न मिळू शकतील. याबरोबरीने गरमागरम बटाटेवडे , समोसे यांप्रमाणे सँडविचसारखे पदार्थ कागदी रॅपरमधून देणे शक्य असल्याने त्यासही मंजुरी देण्यात येणार आहे.