Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 24, 2013 - 15:01:16 PM


Title - प्लॅटफॉर्मचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ
Posted by : nikhilndls on Jul 24, 2013 - 15:01:16 PM

कोल्हापूर

एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते हे रेल्वेबाबतही कायम आहे. मुंबई आणि पुणे येथे प्लॅटफॉर्मची उंची नसल्याने अपघात घडले. त्यावेळी रेल्वे स्थानकात उतरताना पाय प्लॅटफॉर्मवर पडेल , असे मॉडेल प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या सूचना केल्या. मात्र निधीच्या नसल्याची कारणे देत कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्मची उंची वाढविलेली नाही. प्रवाशांना उड्या मारुन रेल्वेस्थानकात प्रवेश करावा लागतो. कोल्हापूर स्थानकात चार प्लॅटफॉर्म आहेत. पहिल्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर पॅसेजर , दोन आणि तीन क्रमाकांच्या प्लॅटफॉर्मवरुन लांब पल्ल्याच्या रेल्वे धावतात. तिन्ही ठिकाणी तारेवरची कसरतच करावी लागते.

असंख्य प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने सुविधांसाठी रेड सिग्नलच दाखविला जातो. उंचीतील तफावत कमी करण्याची केवळ घोषणा झाली. रेल्वेच्या अर्थसंकल्पात कोल्हापूर मॉडेल स्थानक बनवण्याची घोषणा झाली. मात्र किमान मूलभूत सुविधांची पूर्तता स्थानकात झालेली नाही. प्रशासनाच्या कामाची गाडी यार्डातून निघालेलीच नाही. प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने किमान प्राथमिक सुविधा पुरविण्याची गरज आहे.

गुड्स मार्केट यार्डातही हीच स्थिती आहे. येथून साखर , बॉक्साईट आणि मोलॅसिसची निर्यात मोठया प्रमाणावर होते. सिमेंट , धान्य , रासायनिक खते आयात केली जातात. त्यासाठी यार्डात एक ते चार असे स्वतंत्र प्लॅटफार्म आहेत. मात्र प्लॅटफार्म क्रमांक एक आणि दोन हे मृत्यूचे सापळे बनले आहेत. तीन आणि चार क्रमांकावरही बॉक्साईटची चढउतार करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. गुडस् यार्डमधील प्लॅटफार्म क्रमांक एकमध्ये माल वाहतुकीची डबा थांबतो. मात्र , रेल्वे डबा आणि प्लॅटफॉर्मची उंची समान करण्यासाठी पोत्यांचा थर रचावा लागतो.

अपघातात मुलांचाही समावेश

रेल्वेतून खाली उतरताना प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने गेल्या वर्षभरात २० प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. काही प्रवासी धावत जाऊन गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनही काही अपघात घडले आहे. मुलांना आणि यंग सीनियर्संना रेल्वेतून उतरताना अपघाताला सामोरे जावे लागल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात किमान प्लॅटफॉर्मची उंची साडेपाच फूट असावी लागते. रेल्वेचा डबा आणि प्लॅटफॉर्मची समान उंची केल्यास अपघात टळतील. स्थानकाच्या विकासासाठी खास निधीची गरज आहे. बजेटमधून भरघोस निधी मिळाल्यास कायापालट सहज शक्य आहे.

- मोहन शेट्टी

( माजी स्टेशन अधिकारी)