Indian Railways News => Topic started by RailXpert on Jul 03, 2013 - 12:00:05 PM


Title - प्लॅटफॉर्म तिकीट नसणा-यांना दंड
Posted by : RailXpert on Jul 03, 2013 - 12:00:05 PM

नागपूर

प्लॅटफॉर्म तिकीट न काढताच फिरणारे तसेच अवैध विक्री करणारे अशा एकूण १५ जणांवर मंगळवारी रेल्वे पोलिसांनी कारवाई केली . मुख्य रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफने आज १२ जणांना प्लॅटफॉर्म तिकीट नसल्याच्या कारणावरून पकडले . त्यांना प्रत्येकी २०० रु . दंड करून सोडून देण्यात आले . याशिवाय खाद्यपदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले . त्यांना प्रत्येकी २ हजार रु . दंड ठोठावण्यात आला . दोघांनी हा दंड भरून स्वतःची सुटका करून घेतली . मात्र एकाने दंड भरला नाही . त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली .