Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jun 28, 2013 - 12:30:35 PM


Title - प्लॅटफॉर्म गेला पाण्यात
Posted by : puneetmafia on Jun 28, 2013 - 12:30:35 PM

नागपूर

मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाचा फटका रेल्वे स्थानकालाही बसला . संपूर्ण प्लॅटफॉर्म क्रमांक १ पाण्याखाली आला . रुळावर पाणी असल्यामुळे रात्री या प्लॅटफॉर्मवरी रेल्वे वाहतूक काही तास बंद ठेवण्यात आली होती . मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे प्रबंधक बृजेश दीक्षित यांनी मध्यरात्री १२ च्या सुमारास या प्लॅटफॉर्मची पाहणी केली .

मंगळवारी दिवसभर आणि नंतर रात्रीही जोराचा पाऊस सुरू होता . त्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले होते . रेल्वे स्थानकावर आरक्षण काऊंटर , लोहमार्ग पोलिस ठाणे , आरपीएफ ठाणे यातही पाणी घुसले . रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांची संख्या तुलनेने कमी होती . डीआरएम दीक्षित यांनी रात्रीच प्लॅटफॉर्म गाठून संबंधित कर्मचाऱ्यांना पाणी बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या . डीआरएम कार्यालयातील काही भागांतही पाणी शिरले होते .

अनेक गाड्यांना उशीर

पावसामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांना उशीर होत आहे . १२८३४ हावडा - अहमदाबाद एक्स्प्रेस २ . १५ तास , १२१४६ भुवनेश्वर - एलटीटी दीड तास , १२२९६ पाटणा - बंगलोर संघमित्रा एक्स्प्रेस दीड तास , ६३६० पाटणा - एर्नाकुलम दीड तास उशिराने धावत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले .