Indian Railways News => Topic started by railgenie on May 15, 2012 - 00:00:42 AM


Title - पश्‍चिम रेल्वेवर ख्वाजा उरुस विशेष एक्‍स्प्रेस
Posted by : railgenie on May 15, 2012 - 00:00:42 AM

मुंबई- पश्‍चिम रेल्वेवर 23 व 27 मे या कालावधीत ख्वाजा उरुस विशेष एक्‍स्प्रेस (ट्रेन नंबर 09027) सोडण्यात येणार आहेत. या एक्‍स्प्रेस वांद्रे टर्मिनस ते अजमेरदरम्यान धावतील, वांद्रे टर्मिनस येथून ही एक्‍स्प्रेस 23 आणि 26 तारखेला सकाळी 7.55 वाजता सुटेल. अजमेरला ती दुसऱ्या दिवशी पहाटे 2.40 वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात ही एक्‍सप्रेस अजमेरहून 24 व 27 मे रोजी सकाळी 8.10 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी ती पहाटे 5.10 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. या एक्‍स्प्रेस बोरिवली, वापी, बलसाड, सुरत, भरूच, बडोदा, आनंद, नदीयाड, अहमदाबाद, मेहसाणा, सिद्धपुरा, छपी, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवा जंक्‍शन, दोराई या स्थानकांवर थांबतील. या एक्‍स्प्रेसचे आरक्षण 16 मे पासून प्रवाशांसाठी खुले होणार आहे, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आली.