Indian Railways News => Topic started by irmafia on May 06, 2012 - 03:00:21 AM


Title - पश्‍चिम रेल्वेवर आज तर उद्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Posted by : irmafia on May 06, 2012 - 03:00:21 AM

मुंबई - मध्य रेल्वेच्या वतीने माटुंगा ते मुलुंड व हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्ददरम्यान रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. रविवारी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रवासात हाल होण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम रेल्वेचा शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम उपनगरी लोकल वाहतुकीवर जाणवणार नाही.

मध्य रेल्वेच्या "डाऊन जलद मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान 'ब्लॉक' असल्यामुळे सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 या वेळेत डाऊन धीम्या मार्गावरून धावतील. माटुंगा-मुलुंडदरम्यान सर्व स्थानकांवर त्या थांबविण्यात येतील. ठाणे स्थानकानंतर त्या पुन्हा जलद मार्गावरून चालविण्यात येतील.

कुर्ला-मानखुर्ददरम्यान अप व डाऊन मार्गावर ब्लॉक असल्यामुळे वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या लोकल सकाळी सव्वादहा ते सव्वातीन वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला व मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. हार्बरच्या प्रवाशांना ठाणे-वाशी नेरूळ या ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे.

पश्‍चिम रेल्वेचा आज 'नाईट ब्लॉक'

पश्‍चिम रेल्वेचा शनिवारी मध्यरात्री 12.45 ते पहाटे 4.45 या वेळेत दुरुस्तीच्या कामासाठी "नाईट ब्लॉक' घेण्यात येणार आहे. अप व डाऊन मार्गावर हा ब्लॉक आहे. या काळात विरारला जाणाऱ्या व सीएसटीला येणाऱ्या लोकल जलद मार्गावरून चालविण्यात येतील. रविवारी गर्दीच्या वेळेत मेगाब्लॉक नसल्यामुळे पश्‍चिम उपनगरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.