Indian Railways News => Topic started by eabhi200k on May 25, 2012 - 03:00:14 AM


Title - पश्‍चिम रेल्वे पावसाला तोंड देणार
Posted by : eabhi200k on May 25, 2012 - 03:00:14 AM

मुंबई- पावसाळ्यात रेल्वे वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पश्‍चिम रेल्वे युद्धपातळीवर कामाला लागली आहे. त्यासाठी रेल्वे मार्गालगतची नालेसफाई, तसेच खोलगट भागातील रुळाखाली भराव करणे आदी कामे वेगाने सुरू आहेत.

पश्‍चिम रेल्वे मार्गावर नालासोपारा, वसई रोड, कांदिवली, मालाड, गोरेगाव, बांद्रा पूर्वेकडील मार्ग सखल भागात आहेत. त्यामुळे भराव टाकून येथील मार्ग उंच करण्यात येत आहेत. महापालिकेच्या सहकार्याने 43 नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले असून ते 31 मेपर्यंत पूर्ण होईल. मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा, मिरा रोड, माहीम, अंधेरी, नालासोपारा, विरार आदी सखल भागांतील स्थानकांत पावसाचे पाणी साचून रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्‍यता असल्याने या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी 52 डिझेलपंप बसवण्यात आले आहेत.

रेल्वेची सिग्नल यंत्रणा, टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांची डागडुजी करण्यात येत आहे. रेल्वे मार्गावरील पादचारी पूल, रोड ओव्हरब्रिज यांचीही डागडुजी हाती घेण्यात आली आहे. मोठा पाऊस झाल्यानंतरही रेल्वे वाहतूक बंद पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे, असे पश्‍चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. संबंधित बातम्या मुंबईत पावसाचे दोन बळी