| Indian Railways News => | Topic started by AllIsWell on Jul 21, 2013 - 09:00:23 AM |
Title - पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीतPosted by : AllIsWell on Jul 21, 2013 - 09:00:23 AM |
|
|
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते वांद्रे या धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते वांद्रे या धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे चर्चगेट ते वांद्रे दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. तर पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशीराने धावत आहेत. खार आणि वांद्रे दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. चर्चगेट ते वांद्रे दरम्यानची धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर चालवण्यात येत आहे. |