Indian Railways News => Topic started by irmafia on Jul 22, 2013 - 09:00:42 AM


Title - पनवेल स्टेशनात सीव्हीएम मशिन्सची सुविधा
Posted by : irmafia on Jul 22, 2013 - 09:00:42 AM

नवी मुंबई

पनवेल रेल्वे स्टेशनात अनेक दिवसांपासून सीव्हीएम ( कूपन व्हॅलिडेटिंग मशिन्स ) सुरू नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता . प्रवाशांनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर अखेर रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकातील सीव्हीएम मशीन सुरू केल्या आहेत .

पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांना नेहमीच विविध प्रकारच्या गैरसोयींना सामोरे जावे लागते . त्यात बंद सीव्हीएम आणि बंद इंडिकेटर्सची भर पडली होती . गर्दीच्या वेळेस तिकीटाच्या रांगेत उभे राहण्यात वेळ जाऊ नये याकरिता सीव्हीएमची सोय प्रत्येक रेल्वे स्टेशनवर करण्यात आली आहे . परंतु पनवेल रेल्वे स्थानकात चार मशिन्स एकाचवेळेस बंद पडल्याने प्रवाशांना तिकिटांच्या रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत होते . तिकीट खिडक्यांची अपुरी संख्या त्यातच बंद सीव्हीएममुळे प्रवाशांच्या त्रासात आणखीनच भर पडली होती .

अखेर प्रवाशांनी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने बंद सीव्हीएम पुन्हा सुरू केल्या आहेत . तसेच मशिन्सची संख्याही वाढवली आहे . येथील प्लॅटफॉर्मवर इंडिकेटर्सची संख्या कमी असल्याने त्याचाही प्रवाशांना त्रास होतो . हा त्रास दूर करण्यासाठी दोन महिन्यांत प्लॅटफॉर्मवर १४ अतिरिक्त इंडिकेटर्स बसवण्यात येणार असल्याची माहिती स्टेशन व्यवस्थापक डी . के . गुप्ता यांनी दिली .