Indian Railways News => | Topic started by Mafia on Oct 01, 2013 - 15:00:23 PM |
Title - प.रेल्वे विस्कळीतPosted by : Mafia on Oct 01, 2013 - 15:00:23 PM |
|
यार्डात जाताना एक्सप्रेस गाडीचा डबा महालक्ष्मी स्टेशन जवळ घसरल्यामुळे पहाटे सव्वाचारपासूनच पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरिवली-चर्चगेट दरम्यान अप आणि डाऊन मार्गाला या दुर्घटनेचा फटका बसला. सकाळी सातच्या सुमारास डबा रुळावरुन दूर करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. लवकरच वाहतूक सुरळीत होईल, असे आश्वासन पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांनी दिले. |