Indian Railways News => Topic started by nikhilndls on Sep 16, 2013 - 17:56:20 PM


Title - नागपूर-मुंबई गाड्यांचा खोळंबा
Posted by : nikhilndls on Sep 16, 2013 - 17:56:20 PM

अकोल्यातील पारस स्टेशनजवळ रेल्वे रुळाखालील स्लीपर वाहून गेल्याने भुसावळ-नागपूर रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर नागपूर-मुंबई वाहतुकीचाही वेग मंदावला आहे. या मार्गावरून जाणा-या लांबपल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्या आहेत.

नागपूर आणि परिसरात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच पारसजवळील रेल्वेमार्गावर आलेल्या पाण्याने रुळाखालील स्लीपर आणि खडी वाहून गेली. यामुळे या मार्गावरील रेल्वेवाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला असून त्या अन्य मार्गाने आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न रेल्वेप्रशासन करत आहे. अमरावती एक्सप्रेसदेखील शेगाव येथे थांबवण्यात आली होती.

दरम्यान, रेल्वे स्लीपर टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. असे असलेतरी हे काम पूर्ण होण्यासाठी दुपारचे एक वाजण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.