Indian Railways News => Topic started by RailXpert on Jun 28, 2013 - 15:01:01 PM


Title - नागपूर दुरंतो एक्सप्रेसला अजनी स्थानकावर थांबा द्या
Posted by : RailXpert on Jun 28, 2013 - 15:01:01 PM

नागपूर

दुंरतो एक्सप्रेसला अजनी स्थानकावर थांबा देण्यासहच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे प्रबंधक बृजेश दी ​ क्षित यांना निवेदन देण्यात आले .

मनसेचे शहर उपाध्यक्ष तसेच रोजगार व स्वयंरोगार विभागाचे शहर संघटक महेश जोशी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले . नागपूरला उतरणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व दुरंतो एक्सप्रेसला अजनी स्थानकावर थांबा द्यावा , रेल्वेस्थानकाबाहेरील वाहन तळासाठीची जागा अपुरी पडत असल्याने त्यात वाढ करावी , फलाट क्र , ५ , ६ व ७ वर कायमस्वरूपी दुकाने उपलब्ध करावी , याच फलाटांच्या तसेच रुळांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे , आरक्षणातील दलालांचे वर्चस्व बंद करावे , रेल्वे स्थानकावरील चोऱ्या , गाडीत तृतीय पंथीयांकडून होणारा त्रास थांबवावा , रेल्वे स्थानक परिसराचे सौंदर्य राखण्यासाठी महापालिकेला निवेदन देऊन उड्डाण पुलाखालील दुकाने व उपाहारगृहे यांना स्वच्छता पाळण्याच्या नोटीस द्याव्या , अन्यथा कारवाई करावी , नागपूर तसेच अजनी स्थानकावर राजकीय पदाधिकाऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी विशेष मोफत व्यवस्था उपलब्ध करून द्यावी , अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या . दीक्षित यांनी या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले . या शिष्टमंडळात मनसेचे मध्य नागपूर अध्यक्ष प्रशांत निकम , मंदार वैद्य , दक्षिण नापूर संघटक अमोल धनुष्कर , संतोष गायकवाड , अक्षय हेटे आदींचा समावेश होता .