Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 22, 2013 - 05:59:53 AM


Title - दक्षिणेतून येणा-या गाड्यांना उशीर
Posted by : nikhilndls on Jul 22, 2013 - 05:59:53 AM

नागपूर

अतिवृष्टीमुळे चंद्रपूर व हिंगणघाट येथे रेल्वे रूळ पाण्याखाली बुडाले . त्यामुळे शुक्रवारी दक्षिणेकडून येणाऱ्या गाड्यांना ३ ते ४ तास उशीर झाला . १२४२९ बंगलोर - हजरत निमामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आज शुक्रवारी चार तास उशिराने आली , तर राप्तीसागर एक्स्प्रेस , त्रिवेंद्रम - कोरबा या गाड्यांना जवळपास पावणेतीन तास उशीर झाला . नागपूरवरून दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या त्यांच्या नियोजित वेळीच सुटल्या . आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर आणि हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील रूळ पाण्याखाली आले . त्यामुळे या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या . ज ‍ वळपास दोन तासांनी हे पाणी ओसरल्यावर रेल्वे वाहतूक सुरळीत झाले . रात्रीही पाऊस असाच सुरू राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर काही प्रमाणात त्याचा परिणाम होऊ शकतो , अशी माहिती सूत्रांनी दिली .