Indian Railways News => Topic started by eabhi200k on Jul 07, 2013 - 00:00:11 AM


Title - तीनही मार्गांवर मेगाब्लॉक
Posted by : eabhi200k on Jul 07, 2013 - 00:00:11 AM

मुंबई

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मरिन लाइन्स ते माहीमपर्यंत डाऊन स्लो लोकल फास्ट डाऊन मार्गावर धावतील. काही लोकल रद्दही करण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावर कुर्ला आणि सीएसटी​ स्टेशनदरम्यान अप आणि वडाळा आणि माहीमदरम्यान अप आणि डाऊनवर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सीएसटी ते अंधेरी/वांद्रे ते सीएसटी सेवा खंडित राहणार आहे. अप हार्बर मार्गावर कुर्लावरून सीएसटीसाठी सुटणाऱ्या लोकल सकाळी ११.०८ ते दुपारी ३.२३ वाजेपर्यंत मेन लाइनवरून चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीमपर्यंत सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात डाऊन स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावरून चालवण्यात येतील.

कल्याण ते बदलापूर सेवा खंडित...

कल्याण आणि अंबरनाथ स्टेशनदरम्यान दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याणवरून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल दुपारी १.३२ ते ३.१७ आणि बदलापूरहून सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल दुपारी १.४९ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत खंडित करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी बदलापूर आणि कर्जतदरम्यान विशेष शटल सेवा चालवण्यात येणार आहे.