Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 03, 2013 - 20:00:28 PM


Title - ठाणे-पनवेल लोकल वाहतूक ठप्प
Posted by : railgenie on Jul 03, 2013 - 20:00:28 PM

ठाणे

ट्रान्स हार्बर म्हणजेच ठाणे-पनवेल रेल्वे मार्गावरील ऐरोली स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने ठाणे पनवेल मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

ठाणे-पनवेल मार्गवर सकाळी ९च्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याने रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार झाल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. अनेकांना कार्यालयांमध्ये लेटमार्क लागला.

या घटनेनंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.