Indian Railways News => Topic started by RailXpert on Jun 28, 2013 - 21:01:31 PM


Title - खंडाळा घाटात एक्सप्रेसवर दरड कोसळली
Posted by : RailXpert on Jun 28, 2013 - 21:01:31 PM

लोणावळा,दि.२८- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटात दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनवर दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.यात इंजिनचालकासह गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित आहे.
सकाळी साडे सहाच्या सुमारात पुण्याच्या दिशेने जाणा-या निजामुद्दिन-पुणे दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनवर खंडाळ्यातील मंकी हिल पॉईंटजवळ दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेतून इंजिन चालक बचावला असून गाडीतील अन्य प्रवासीही सुखरुप आहेत. मात्र यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणा-या एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक खोळंबली आहे.दरम्यान, मदतकार्यासाठी रेल्वेच्या तज्ज्ञाचे मदत पथक लोणावळा येथे दाखल झाल्याचे वृत्त आहे.