Indian Railways News => Topic started by railgenie on Jun 24, 2013 - 09:01:11 AM


Title - कोकण रेल्वे स्थानकांत ‘बायो टॉयलेट’
Posted by : railgenie on Jun 24, 2013 - 09:01:11 AM

मुंबई – कोकण रेल्वेवर असलेल्या मोठ्या स्थानकांवर यापुढे ‘बायो टॉयलेट’ची सुविधा मिळणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून, मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये या पूर्वी ‘बायो टॉयलेट’ची संकल्पाना यशस्वीरीत्या राबवण्यात आली आहे. मात्र कोकण रेल्वेच्या माध्यमातून प्रथमच ती स्थानकांवर राबविण्यात येणार आहेत. चिपळूण आणि कणकवली स्थानकापासून त्याची सुरुवातही झाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या माध्यमातून ‘बायो टॉयलेट’ सुविधा विकसित करण्यात आली आहे. या शौचालयांचा कोणताही देखरेख खर्च नाही. शिवाय यासाठी स्वतंत्र शौचटाकीचीही गरज लागत नाही. या तंत्रज्ञानाच्या आधारे मैला नष्ट होऊन त्याचे रूपांतर गॅसमध्ये होते. त्यामुळे अस्वच्छता राहण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर नियमित शौचालय उभारण्याच्या तुलनेत ‘बायो टॉयलेट’ लवकर तयार होतात. काही दिवसांत ती उभारली जाऊ शकतात व त्यासाठी अवधा ३० हजार रुपये खर्च येतो. नियमित शौचालयांसाठी जवळपास एक लाख रुपये खर्च येतो. शिवाय त्यांची देखभाल ठेवणेही अवघड असते. या सर्व बाबी विचारात घेता रेल्वे स्थानकांवर ‘बायो टॉयलेट’ उपलब्ध करण्याची संकल्पणा कोकण रेल्वेने मांडली आणि ती आता प्रत्यक्षात येते आहे. कोकण रेल्वेच्या मोठ्या स्थानकांत ती उभारली जातील.