| Indian Railways News => | Topic started by riteshexpert on Jul 24, 2013 - 09:00:49 AM |
Title - कॉटन ग्रीन स्थानकात सुविधांचा बोजवाराPosted by : riteshexpert on Jul 24, 2013 - 09:00:49 AM |
|
|
मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकावर प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. उद्घोषणा होत नसल्याने व बंद पडलेल्या इंडिकेटर्समुळे प्रवाशांचा गोंधळ रोजचाच झाला आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर एक-दोन दिवस काम सुरळीत होते, त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. उद्घोषणा करण्यासाठी पुरेसे कर्मचारीच नसल्यामुळे झालेल्या गोंधळातून चुकीच्या उद्घोषणा दिल्या जातात. तर या कर्मचा-यांच्या सुटीच्या दिवशी उद्घोषणा बंद असतात. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणा-या गाडयांच्या फलाटांवरील इंडिकेटर कायम बंदच असते तर उपनगरांकडे जाणा-या फलाटावरील इंडिकेटरवर पनवेलकडे जाणारी लावली असताना अंधेरी गाडी येते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी एकच गर्दी होते. महिला, लहान मुले आणि वृद्धांचे मोठे हाल होतात. कॉटन ग्रीन परिसरातील लोकसंख्या वाढली असताना पुरेशा प्रमाणात एटीव्हीएम मशिन्स बसवण्यात आलेल्या नाहीत. त्यातील तीनपैकी एक मशिन कायम बंद असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना तिकिटांसाठी रांगाच लावाव्या लागतात. प्रसाधनगृहाचीही वेळच्या वेळी सफाई होत नसल्यामुळे फलाटांवर दरुगधी पसरलेली असते. प्रवाशांनी याबाबत स्टेशनमास्तरांकडे तक्रार केली होती. मनुष्यबळ कमी असल्याने स्वच्छता होत नसल्याचे कारण सांगण्यात आले. कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकात उद्घोषणा न होणे हा नेहमीचा प्रकार आहे. स्थानकातील अधिका-यांकडे अनेकदा याबाबतच्या तक्रारी केल्या तरीही त्याची दखल घेतली गेलेली नाही. आम्ही काही करू शकत नाही, अशी उत्तरे दिली जातात. पुरुषांसाठीचे प्रसाधनगृह स्थानकाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे स्थानकाच्या मधोमधच दरुगधी व अस्वच्छता असते, अशी तक्रार महिला प्रवाशांनी केली. गाडय़ांच्या वेळा सांगण्यासाठी केवळ २ कर्मचारी कॉटन ग्रीन स्थानकात लोकलच्या वेळा सांगण्यासाठी केवळ दोनच कर्मचारी आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी उद्घोषणा सेवा बंद असल्याचे स्पष्टीकरण रेल्वेकडून दिले जाते. मात्र दोन्ही कर्मचा-यांचे सुटीचे दिवस सारखे नसतानाही उद्घोषणा बंद असल्याबाबत अधिका-यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगले. रेल्वेच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या स्थानकातील कार्यालयातील दोन पदे रिक्त आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आले असल्याची माहिती येथील अधिका-यांनी दिली. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून कुठलाही निर्णय न आल्यामुळे ही पदे भरण्यात आली नसल्याचेही अधिका-यांनी सांगितले. स्थानकातील छोटय़ा जागेत असलेल्या तिकीट घरासमोर रांगा लावताना प्रवाशांची गैरसोय होते. एटीव्हीएम मशिनही बंद असते. याबाबत वडाळा किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर तक्रार करण्याची सूचना येथील अधिका-यांकडून केली जाते. - अजित गोसावी, प्रवासी जुन्या एटीव्हीएम मशिनपैकी काही मशिनचा कार्यकाळ संपल्याने त्या बंद आहेत. त्याबदल्यात दोन नव्या मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. इंडिकेटर्समध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याने ते चालत नसावेत. मात्र लवकरच दुरुस्त केले जातील. तिकीट देणा-या कर्मचा-यांची पदे लवकरच भरली जातील. याबाबत कार्यवाही सुरू आहे. - नरेंद्र पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख |