Indian Railways News => Topic started by railenquiry on Oct 04, 2013 - 12:00:31 PM


Title - काही गाड्या डोंगरगढला थांबणार
Posted by : railenquiry on Oct 04, 2013 - 12:00:31 PM

नागपूर: नवरात्रानिमित्त डोंगरगढ येथे होणारी यात्रा व भाविकांची गर्दी लक्षात घेता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने काही गाड्यांना डोंगरगढ स्थानकावर तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे . ५ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ही यात्रा असते .

१२१३० - १२१२९ हावडा - पुरी - हावडा , १२८१२ - १२८११ हतिया - एलटीटी - हतिया , १८४७३ - १८४७४ पुरी - जोधपूर - पुरी , १२९०६ - १२९०५ हावडा - पोरबंदर - हावडा , १७००८ - १७००७ दरभंगा - सिकंदराबाद - दरभंगा या गाड्यांना ५ ते १४ ऑक्टोबर या काळात डोंगरगढ स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे . तसेच याच काळात १२८५५ बिलासपूर - नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेसला कामठी येथे २ मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे . ५८२०८ भवानी पटणा - रायपूर , ५८२०४ रायपूर - गेवरा रोड , ५८८१८ तिरोडी - तुमसर या गाड्या उपरोक्त कालावधीत डोंगरगढपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत . ६८७४१ - ६८७४२ दुर्ग - गोंदिया - दुर्ग ही गाडी रायपूरपर्यंत धावणार आहे . १२८३९ गेवरा रोड - नागपूर या गाडीत ५ ते १४ ऑक्टोबर दरम्यान तसेच , १८२४० नागपूर - बिलासपूर एक्स्प्रेस , १२८५६ - १२८५५ नागपूर - बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये ६ ते १५ ऑक्टोबरदरम्यान एक अतिरिक्त स्लिपर कोच लावण्यात येणार आहे .