Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 03, 2013 - 12:00:38 PM


Title - कमी अंतरासाठी सर्वाधिक ताण
Posted by : nikhilndls on Jul 03, 2013 - 12:00:38 PM

मुंबई

उपनगरी लोकलसेवेवर प्रवाशांचा सर्वाधिक ताण हा सर्वात कमी अंतरावर येत असल्याचे आढळून आले आहे. विरार ते चर्चगेट, खोपोली ते सीएसटी या टप्प्यांपेक्षा कोणत्याही २० किमीच्या अंतरावर सर्वाधिक ४५ टक्के प्रवासी प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, ४० किमी अंतरापर्यंत २४ टक्के प्रवासी प्रवास करतात. त्यापुढील मोठ्या अंतराच्या टप्प्यावर उर्वरित ३१ टक्के प्रवासी आहेत.

मुंबई रेल्वे विकास महामंडळने (एमआरव्हीसी) २०११पर्यंत प्रवासी संख्येच्या घेतलेल्या आढाव्यातून कमी अंतरावर सर्वाधिक प्रवाशांची नोंद झाली आहे. मध्य रेल्वेवर कमी अंतरासाठी जास्त प्रवासी दिसून आले आहे. ० ते १० किमीसाठी २९ टक्के प्रवासी असून, ' परे ' वर या अंतरासाठी फक्त ९ टक्के प्रवाशांचा कल आहे. तर ४१ ते ५० आणि ५१ ते ६० किमी अंतरासाठी साडेसहा टक्के प्रवासी ये-जा करतात.

४५ टक्के प्रवासी - २० किमीचा टप्पा

२४ टक्के प्रवासी - ४० किमीपर्यंत (सीएसटी ते ठाणे)

३१ टक्के प्रवासी - ४० किमीपेक्षा जास्त

एक तासाहून जास्त प्रवास नको...

रेल्वे प्रवासातील दगदग आणि वेळ वाचवण्यासाठी एक तासांहून जास्त वेळ प्रवास करण्याची प्रवाशांची मानसिकता नसल्याचे या अहवालातून स्पष्ट झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सीएसटी ते विक्रोळी आणि चर्चगेट ते अंधेरी अंतर सुमारे २२ किमीचे आहे. त्यासाठी स्लो लोकलने ४० मिनिटे; तर फास्ट लोकलने अर्धा तास लागतो.

प्रवासाचे टप्पे आणि प्रवासी संख्या

१० किमीपर्यंत (सीएसटी ते दादर)

मध्य रेल्वे

२९.१६ टक्के प्रवासी - ४,१७,८५२

पश्चिम रेल्वे

९.३८ टक्के प्रवासी १,१९,८०२

११ ते २० किमी (सीएसटी ते कुर्ला)

मध्य रेल्वे

२४.०९ टक्के प्रवासी - ३,४५,१५२

पश्चिम रेल्वे

२५.०४ टक्के प्रवासी - ३,१९,६४६

२१ ते ३० किमी (सीएसटी ते विद्याविहार)

मध्य रेल्वे

१९.३७ टक्के प्रवासी - २,७७,५२२

पश्चिम रेल्वे

१८.३४ टक्के प्रवासी - २,३४,२१२

३१ ते ४० किमी (सीएसटी ते ठाणे)

मध्य रेल्वे

१३.३८ टक्के प्रवासी - १,९१,६४९

पश्चिम रेल्वे

२२.४१ टक्के प्रवासी - २,८६,१५४

४१ ते ५० किमी (सीएसटी ते कल्याण)

मध्य रेल्वे

४.९४ टक्के प्रवासी - ७०,७३८

पश्चिम रेल्वे

७.३७ टक्के प्रवासी - ९४,१४३

५१ ते ६० किमी (सीएसटी ते अंबरनाथ)

मध्य रेल्वे

६.२२ टक्के प्रवासी - ८९,०६७

पश्चिम रेल्वे

६.७४ टक्के प्रवासी - ८६,०७३

६१ ते ७० किमी

मध्य रेल्वे

०.३४ टक्के प्रवासी - १८,२३७

पश्चिम रेल्वे

५.२९ टक्के प्रवासी - ६७,५५५