Indian Railways News => Topic started by RailXpert on Aug 02, 2013 - 09:02:04 AM


Title - ए. के. गुप्ता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नवे एडीएम
Posted by : RailXpert on Aug 02, 2013 - 09:02:04 AM

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक म्हणून ए.के. गुप्ता यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. एस.के. गुप्ता हे यापूर्वी दक्षिण पूर्व रेल्वेत खडगपूर येथे मुख्य कारखाना प्रबंधक (वॉगन) या पदावर कार्यरत होते. गुप्ता हे इंडियन रेल्वे सव्‍‌र्हिस इन मेकॅनिकल इंजिनियरिंग (आय.आर.एस.एम.ई)च्या १९८७ च्या तुकडीतील बी.टेक. (मेकॅनिकल) आहेत. १९८९ साली भारतीय रेल्वेच्या सेवेत आलेल्या गुप्ता यांनी यांत्रिकी विषयांशी जुळलेल्या निरनिराळ्या योजनांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. यापूर्वी नागपूर विभागात अतिरिक्त व्यवस्थापक पदावर असलेले शैबाल बोस यांची मुख्य यांत्रिकी अभियंता (योजना व कारखाना) या पदावर बिलासपूर येथे बदली झाली आहे.