Indian Railways News => | Topic started by irmafia on Sep 30, 2013 - 15:00:13 PM |
Title - अमरावती-नरखेड रेल्वे लवकरचPosted by : irmafia on Sep 30, 2013 - 15:00:13 PM |
|
वर्धा: अमरावती - नरखेड रेल्वेगाडी याच आठवड्यात कार्यरत होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाद्वारे खासदार दत्ता मेघे यांच्या कार्यालयात प्राप्त झाली आहे. नरखेड-अमरावती हा रेल्वे मार्ग तयार होऊन बराच कालावधी झाला. घोषणा होऊनही या मार्गावर नवीन रेल्वे गाडी सुरू झाली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. मात्र, याच रेल्वे अर्थसंकल्पात नवीन गाडीचा समावेश करून ५११५१-५११५२ या क्रमांकाची रेल्वेगाडी आता कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयाद्वारे देण्यात आली आहे. यासोबतच भुसावळ-अमरावती रेल्वे गाडीही नरखेड स्थानकापर्यंत नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेमंत्र्यांच्या या घोषणेचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. |