Indian Railways News => Topic started by railenquiry on Sep 01, 2013 - 14:57:20 PM


Title - अजनी-मुंबई रेल्वे वाशीममार्गे जाणार
Posted by : railenquiry on Sep 01, 2013 - 14:57:20 PM

अजनी-मुंबई रेल्वे वाशीममार्गे जाणार

अनेक वर्षांपासून जिल्ह्य़ातील नागरिकांची वाशीमवरून मुंबईला जाणारी रेल्वे सुरू व्हावी, अशी मागणी होती. येत्या १५ दिवसात अजनी (नागपूर)-मुंबई ही गाडी सुरू होणार असून ती अजनी (नागपूर), अकोला, वाशीम, नांदेडमार्गे मुंबईला जाणार असल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. ही रेल्वेगाडी वाशीम मार्गे सुरू व्हावी, यासाठी भावना गवळी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. मार्च २०१३ च्या अर्थसंकल्पात रेल्वेमंत्र्यांनी या गाडीला परवानगी दिली होती. येत्या १५ दिवसात ही नवीन गाडी सुरू होणार आहे. या नवीन गाडीमुळे जिल्ह्य़ातील मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने चांगली सोय होणार आहे.