Indian Railways News => Topic started by eabhi200k on Jul 03, 2013 - 18:04:40 PM


Title - SHALIMAR-LTT दरम्यान विशेष सुपरफास्ट
Posted by : eabhi200k on Jul 03, 2013 - 18:04:40 PM

नागपूर

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता शालिमार - लोकमान्य टिळक टर्मिनस ( एलटीएस )- शालिमार दरम्यान नागपूर मार्गे विशेष सुपरफास्ट गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे .

या गाडीचा तपशील असा - ०८०५९ एलटीएस - शालिमार - ही विशेष गाडी एलटीएसवरून शुक्रवारी ५ जुलैच्या पहाटे ( गुरुवार व शुक्रवार यांच्या मध्ये ) ४ . ४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ८ . २० वाजता शालिमार येथे पोहचेल . ही गाडी ५ जुलै रोजी वर्धा स्थानकावर १२ . २७ वाजता येईल व १२ . ३० वाजता सुटेल . नागपूर स्थानकावर १३ . ५० वाजता आगमन होईल आणि १४ वाजता प्रस्थान होईल .

०८०६० शालिमार - एलटीएस - ही विशेष गाडी शालिमारवरून बुधवारी ३ जुलै रोजी ६ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी १३ . ३५ वाजता एलटीएसला पोहचेल . ही गाडी ४ जुलै रोजी नागपूर स्थानकावर ०० . ०५ वाजता येईल व ०० . २५ वाजता सुटेल . वर्धा स्थानकावर १ . ३७ वाजता आगमन होईल आणि १ . ४० वाजता प्रस्थान होईल .

या गाडीला कल्याण , नाशिक , मनमाड , भुसावळ , अकोला , बडनेरा , वर्धा , नागपूर , गोंदिया , दुर्ग , रायपूर , बिलासपूर , झारसुगुडा , राऊरकेला , चक्रधरपूर , टाटानगर , खरगपूर व संत्रागाछी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे . या गाडीला एकूण १७ कोचेस आहेत . यात १ तृतीय वातानुकूलित ८ शयनयान , ६ साधारण द्वितीय श्रेणी व २ एसएलआर कोच आहेत . ०८०५९ या विशेष गाडीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर ४ जुलैपासून उपलब्ध होणार आहे .