Indian Railways News => | Topic started by irmafia on Oct 17, 2012 - 11:30:21 AM |
Title - pune- mumbai railway, three cattle rammed - रेल्वेखाली गायी सापडल्याने पुणे-मुंबई वाहतूक रात्रभर विसPosted by : irmafia on Oct 17, 2012 - 11:30:21 AM |
|
पुणे- चेन्नईहून मुंबईकडे जाणा-या एक्स्प्रेसखाली सापडून तीन गायींचा मृत्यू झाल्यामुळे पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक रात्री एकपासून बुधवारी पहाटे सहापर्यंत विस्कळीत झाली होती. मात्र सहानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी रात्री चेन्नई-मुंबई एक्स्प्रेसला पाच गायी आडव्या आल्या. त्यातील तीन गायी रेल्वेखाली सापडल्या व जागीच मृत्यूमुखी पडल्या. दोन गायी बचावल्या. मात्र त्यानंतर रेल्वेसेवा विस्कळीत झाली. यामुळे दहा एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पाच ते सहा तास पुणे-लोणावळा स्थानकांदरम्यान अडकून पडल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. याचबरोबर दहा-बारा रेल्वेगाड्या पाच ते सहा तास उशीरा धावत आहेत. पुणे- लोणावळा या दरम्यानच्या दोन लोकलगाड्या यामुळे रद्द केल्या आहेत. |